24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती, लस पुरविणे, त्याचे वितरण व प्रशासन इ. गोष्टींचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारच्या गृहमंत्रालयातर्फे कोरोनाचा फैलाव अधिक असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व इतर संबंधित अधिकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान श्री. मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर गृहमंत्री अमित शहा या बैठकीचे समन्वयक होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सचिवालयातून या बैठकीला उपस्थिती लावली.

कोविड महामारीमुळे उत्पन्न झालेल्या बिकट परिस्थितीतून आपण जात आहोत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने सुरूवातीपासूनच विविध उपाययोजना केल्या आहेत आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यावर विशेष भर दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्व राज्यांचा सहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगत मोदींनी ही महामारी अधिक काही काळ राहणार असून, त्यासाठी आपण पद्धतशीरपणे काम करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.

दरम्यान, मोदी यांनी यावेळी कोरोनावरील लस नक्की कधीपर्यंत येईल हे वैज्ञानिकांच्या हातात आहे. ते आम्ही ठरवू शकत नाही असे सांगितले. काही लोक यासंबंधी राजकारण करत आहेत परंतु कुणालाही राजकारण करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

कोरोना स्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याशिवाय केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले. मात्र, या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी मात्र सहभाग टाळला. बैठकीत गृहमंत्री अमित शहा हेदेखील सहभागी झाले होते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION