Home बातम्या नव्या कृषी तंत्र प्रशिक्षणासाठी पॉंडिचेरीचे तज्ज्ञ गोव्यात

नव्या कृषी तंत्र प्रशिक्षणासाठी पॉंडिचेरीचे तज्ज्ञ गोव्यात

0

गोव्यात एसआरआय तंत्रज्ञान वापरून शेती करता यावी यासाठी येथील कृषी अधिकार्‍यांना व शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी पॉंडिचेरी येथील जवाहरलाल नेहरू कृषी महाविद्यालयाचे डॉ. चलामकुट्टी गोव्यात आले असून आज सकाळी ते जुने गोवे येथील एला फार्ममध्ये अधिकार्‍यांना प्रशिक्षण देतील, अशी माहिती कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी दिली.

उद्या उत्तर गोव्यातील शेतकर्‍यांना म्हापसा येथे तर परवा दक्षिण गोव्यातील शेतकर्‍यांना नेत्रावळी येथे प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील पद्धतीने शेतीची लागवड केल्यास उत्पादनात दोनपटींनी वाढ होत असल्याचा पॉंडिचेरी व अन्य काही राज्यांतील शेतकर्‍यांचा अनुभव आहे. गोव्यातही प्रतिसाद मिळाल्यास येथील कृषी उत्पादनात वाढ होऊ शकेल. एका ठिकाणी एक रोप लावणे, अशी ही पद्धत असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कृषीमंत्री या नात्याने शेतीच्या उत्पादनात वाढ करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच सरकारने कृषी क्षेत्राचा विकास करण्याचे ठरविले आहे.