28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

नवे राष्ट्रपती

भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. गरीबीतून वर आलेल्या एका दलित व्यक्तीची देशाच्या सर्वोच्च पदावर दुसर्‍यांदा झालेली ही निवड निश्‍चितपणे भारताच्या स्वातंत्र्योत्तर वैचारिक विकासाची साक्ष देते आहे. कोविंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत, परंतु राष्ट्रपतीपद हे एक घटनात्मक पद असल्याने आपल्या संघटनेच्या आणि पक्षाच्या विचारधारेतून मुक्त होऊन संपूर्ण देशाचे राष्ट्रपती म्हणूनच ते कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे. या देशाने आजवर विविध वृत्ती – प्रवृत्तीचे राष्ट्रपती पाहिले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयाला मुकाट संमती देणार्‍या फक्रुद्दिन अली अहमद यांच्यासारख्या ‘रबरस्टँप’ राष्ट्रपतीपासून, विविध देशांत मिळालेल्या औपचारिक भेटवस्तू कार्यकाल संपल्यानंतर घरी घेऊन जाणार्‍या प्रतिभा पाटीलपर्यंत जसे राष्ट्रपती देशाला लाभले, तसेच डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासारखे निःस्पृह स्वातंत्र्यसेनानी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखे तत्त्वचिंतक, के. आर. नारायणन, डॉ. शंकरदयाळ शर्मांसारखे विद्वानही. डॉ. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतीपदावर झालेली निवड ही त्या पदाची शान वाढविणारी होती. ‘जनतेचा राष्ट्रपती’ बनलेले कलाम केवळ ते पद मिरवीत राहिले नाहीत. ते जनतेमध्ये मिसळले, युवकांशी, विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि सन २०२० मधील भारताचे एक भव्योदात्त स्वप्न त्यांनी या नव्या पिढीसमोर ठेवले. डॉ. कलाम यांच्यानंतर राष्ट्रपतीपदावर आलेल्या डॉ. प्रणव मुखर्जी यांनीही त्या पदाची शान आणि मानमर्यादा कायम राखली. याकूब मेमन, अजमल कसाब, अफजल गुरू यासारख्या देशद्रोह्यांना फासावर लटकवण्यास त्यांनी संमती दिली. निर्भया प्रकरणानंतर महिलांविषयीच्या कायद्यांना अधिक कडक बनवणारे अध्यादेश काढले, देशातील वाढत्या असहिष्णुतेवर सरकारला चार शब्द सुनावण्यास त्यांनी कमी केले नाही. राष्ट्रपती भवनाचे संग्रहालय त्यांनी जनतेला खुले केले आहे आणि त्यानिमित्ताने या भव्य ब्रिटीशकालीन वास्तूचे आतले दर्शन आम जनतेला आता शक्य झाले आहे. या सार्‍या संमिश्र परंपरेमध्ये रामनाथ कोविंद कोठे बसतील याविषयी जनतेला उत्सुकता आहे. त्यांच्या ऋजु, विनम्र व्यक्तिमत्त्वाविषयी, साधेपणाविषयी खूप काही बोलले – लिहिले गेले आहे. अठरा विरोधी पक्षांनी प्रतिस्पर्धी उमेदवार देण्याचे ठरविल्यानंतरही संयुक्त जनता दलाचे नेते नीतिशकुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा दर्शविला. इतकेच काय, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनीही कोविंद यांच्या बाजूने आपला कौल दिला. बिजू जनता दल, टीआरएस, अभाअद्रमुक, वायएसआर कॉंग्रेस या सर्व पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असूनही यापूर्वी दोन्ही वेळा आपल्याच उमेदवाराविरुद्ध मतदान करणार्‍या शिवसेनेनेही यावेळी कोविंद यांना पाठिंबा दिला. ही निवडणूक गोपनीय पद्धतीने घेतली जाते, त्यामुळे राजकीय पक्षांना आपल्या सदस्यांना व्हीप जारी करता येत नाही, त्यामुळे सदस्यांना आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे काही बंधन नाही. त्यामुळे या निवडणुकीत सर्रास क्रॉस वोटिंग झालेले आहे. त्यामुळे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील नवी समिकरणेही आकाराला येतील यात शंका नाही. राष्ट्रपतीपद हे केवळ शोभेचे आणि मिरवण्याचे पद आहे या सार्वत्रिक समजाला छेद देत डॉ. अब्दुल कलाम यांनी एक नवी परंपरा या देशात सुरू केली आणि राष्ट्रपतीपदाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. डॉ. मुखर्जी यांनीही आपल्या कार्यकाळात त्या पदाची शान राखली. आता जबाबदारी डॉ. कोविंद यांची आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

गोमंतशाहीर

(विशेष संपादकीय) ही माझी कविता मिरविते |माझ्या गोव्याचीच मिरास ॥स्वर्गाला लाथाडून घेईन |इथल्या मातीचाच सुवास ॥गोव्यावरचे आणि गावावरचे आपले...

फडणवीस दौर्‍याचे फलित

भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवशीय गोवा भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला नवी ऊर्जा आणि चेतना...

घोषणाच घोषणा!

आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात काल गोव्यातील बेरोजगार, खाण व पर्यटन अवलंबितांना मासिक भत्त्याची घोषणा करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला दुसरा...

आधी शाळा की कॅसिनो?

राज्य सरकारने गोमंतकीय जनतेचे पहिल्या डोसचे शंभर टक्के कोरोना लसीकरण झाल्याचा जो दावा केला, त्यामागे कॅसिनो, मसाज पार्लर आणि नाईट क्लब सुरू...