नवीन 50 डिझेल कदंब बससाठी ई-निविदा जारी करणार ः गुदिन्हो

0
30

गोवा कदंब वाहतूक महामंडळासाठी नवीन 50 डिझेल बसगाड्यांच्या खरेदीसाठी ई-निविदा जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत आमदार विजय सरदेसाई आणि आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्या संयुक्त एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.

कदंब महामंडळासाठी नवीन डिझेल बसगाड्यांच्या खरेदीसाठी वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात 31.92 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कदंब महामंडळाकडून ई-बसगाड्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी व्हेरिएबल गॅप फंडिंगची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील कदंब महामंडळाच्या बसगाड्यांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कदंब महामंडळाकडून फेम 2 योजनेखाली 50 ईव्ही बसगाड्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांसाठी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था मडगाव येथे करण्यात आली आहे. कदंब महामंडळाने फेम 2 योजनेखाली 100 ईव्ही बसगाड्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे गुदिन्हो यांनी म्हटले आहे.