प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर सोपवावी यावर सध्या राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये विचार सुरू असून आमदार नसलेल्यांचाच या पदासाठी विचार व्हावा, असे कॉंग्रेसमधील एका गटाचे मत आहे तर काही आमदारांनी वरील पद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी दिग्वीजय सिंह व सचिव चेर्लाकुमार दि. ३ रोजी गोव्यात येत असल्याने त्यांच्या गोवा भेटीनंतरच प्रदेश अध्यक्षपदासाठीचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाचे राष्ट्रीय नेते दिग्वीजय सिंह गोवा प्रभारी असले तरी गोव्याची खर्या अर्थाने जबाबदारी चेर्लाकुमारवरच असतील.