पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाज शरीफ तिसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. शपथविधीला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रित करायला नक्कीच आवडेल असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. डॉ. सिंग आले तर मला व पाकिस्तानला फार आनंद होईल, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत विजयानंतर मनमोहन सिंग यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून अभिनंदन केले व भारतात येण्यासाठी निमंत्रण दिले, आपणही त्यांना निमंत्रण दिले, असे शरीङ्ग यांनी सांगितले. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीसाठी आतूर असल्याचे ते म्हणाले.