‘नवप्रभा’ समूह म्हणजे
आई भगवतीचा आशीर्वाद खरा
गोमंतकाच्या पावन भूमीत
चमचम चमकतो, लखलखता हिरा!
‘अंगण’ पुरवणी, आरोग्य पुरवणी
कुटुंब पुरवणी, तरुणाईचे पान
त्यातच आम्हा मिळे लेखनाचा मान
म्हणूनच आमच्या पाठीवर मिळते
आज कौतुकाची थाप-
पण, हे सगळं करतं तरी कोण?
तर ‘नवप्रभा’ संपादक आणि पत्रकारवर्ग-
म्हटलं, आज रक्षाबंधनाच्या दिवशी
त्यांना भेट कोणती देऊया?
आम्ही सर्व वर्गमित्र सांगतो,
तुम्हाविना लेखनाचा, हा अपूर्ण ठेवा…
- शारदा उच्च माध्यमिक विद्यालय, भेंडाळे, वझरी, पेडणे- गोवाच्या विद्यार्थ्यांकडून सप्रेम-

