नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

0
11

2002च्या गुजरात दंगलीतील नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने काल निर्दोष मुक्तता केली. 11 जणांची हत्या झालेल्या या प्रकरणात गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह सर्वच 68 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद शहराजवळील नरोडा येथे झालेल्या जातीय हिंसाचारात 11 लोक मारले गेले. या प्रकरणी माया कोडनानी, बाबू बजरंगी आणि जयदीप पटेल यांच्यासह 86 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 18 जणांचा या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर उर्वरित 68 जणांविरुद्ध खटला सुरू होता.