नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण

0
59

२००२ च्या गुजरात दंगलीमधील कथित सहभागाच्या कारणावरून अमेरिकी प्रशासनाने अलिकडेच मोदी यांना अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नाकारला होता.

या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मोदी यांनी व्टिटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मी या अमेरिकी शिष्टमंडळाशी चर्चा केली व गुजरात राज्याच्या प्रगतीविषयी त्यांना माहिती दिली. या शिष्टमंडळाने गुजरातमधील विकासकामांविषयी चांगले मतप्रदर्शन केल्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिले’, असे त्यांनी म्हटले आहे. या शिष्टमंडळात रिपब्लिकन सदस्य कॅथी मॅकमॉरिल रॉजर्स, ऍरन शॉक व सिंथिया लुमिन्स तसेच काही उद्योजकांचा समावेश आहे.

मोदी यांना भेटल्यानंतर ऍरन शॉक यांनी मोदी यांना धन्यवाद दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या विकासाची माहिती आम्ही मिळविली असून मोदी हे तडफदार व्यक्तिमत्व असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले.