नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुमारे २.५ लाख लोकांच्या उपस्थितीत खुल्या मैदानावरच्या या सोहळ्यात मोदी यांनी गुजराती भाषेत शपथ घेतली. राज्यपाल कमला बेनीवाल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. सात कॅबिनेट दर्जाच्या व नऊ राज्यमंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली.
सोहळ्यास भाजप उपाध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओम प्रकाश चौटाला शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते.

