राज्याच्या नदी परिवहन खात्याला १ एप्रिल २०१२ ते २८ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत एकूण १.१४ कोटी रू. चा महसूल प्राप्त झाला आहे. राज्य विधानसभेत काल रोहन खंवटे यांच्या अतारांकित प्रश्नावर याविषयी लेखी माहिती देण्यात आली आहे.
या महसुलापैकी सर्वाधिक म्हणजे ९२.६३ लाख रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळाला आहे. या खात्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी २००६ साली सरकारने एका समितीची नियुक्ती केली होती, अशी माहितीही देण्यात आली आहे.

