नदी परिवहन कर्मचार्‍यांना संपास बंदी

0
5

राज्य सरकारने एस्मा लागू करून नदी परिवहन खात्यातील कर्मचार्‍यांना संप करण्यास बंदी काल घातली. नदी परिवहन खात्याच्या कर्मचारी संघटनेने १२ जानेवारी रोजी संपाची नोटीस दिली आहे. नदी परिवहन खात्याने एक नोटीस जारी करून १२ जानेवारीला सर्व कर्मचार्‍यांनी कामावर वेळेवर रुजू व्हावे. त्यांनी आपल्या दैनंदिन कामावरून कुठेही जाऊ नये. प्रत्येकाने आपले कामकाज सुरळीतपणे करावे. वैद्यकीय, अनपेक्षित परिस्थिती आणि वैध औचित्याशिवाय १२ जानेवारीला कामावर हजर न राहणार्‍या कर्मचार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.