25 C
Panjim
Monday, August 2, 2021

धोनीला पुनरागमन अवघड ः प्रसाद

 

भारताचा माजी द्रुतगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने अनुभवी क्रिकेटपटू तथा आपल्या कल्पक नेतृत्वाखाली दोन विश्वचषके जिंकून देणार्‍या महेंद्रसिंह धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धोनी सध्या ३८ वर्षांचा झालेला आहे आणि त्याने २०१९च्या विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आहे. या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याच्या सुमार कामगिरीमुळे बरीच टीका झाली होती. त्याने क्रिकेटमधून निवृत्त व्हावे असे मत बर्‍याच आजी-माजी खेळाडूंकडून व्यक्त झाले होते आणि होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे जगात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. परिणामी क्रिकेट सामने सध्या अनिश्‍चित काळासाठी स्थगित आहेत. त्यामुळे क्रिकेटचे सामने पुन्हा कधी सुरू होतील, हेच ठाऊक नसल्याने धोनीसाठी पुढील काळ अधिक खडतर असेल, असे प्रसाद यांना वाटते.

जवळपास गेल्या १० महिन्यांपासून धोनी क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच करोनाचे संकट टळल्यावर संपूर्ण विश्वाचे टी-२० विश्वचषकावर लक्ष असेल. अशा परिस्थितीत धोनीने इतक्या कमी अवधीत संघात पुनरागमन करणे अशक्यच वाटते. किंबहुना त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकाराची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे प्रसाद म्हणाला.

धोनीच्या तंदुरुस्तीविषयी मला किंचितही शंका नाही. परंतु एखादा क्रीडापटू चाळीशीकडे मार्गक्रमण करताना आपसूकच त्याच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या जातात. त्यामुळे धोनीला स्वत:ची तंदुरुस्ती जपण्यासोबतच संघ व्यवस्थापन आणि कर्णधार यांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल, असेही प्रसाद यांनी सांगितले.
त्याशिवाय धोनीने संघात पुनरागमन केल्यास त्याला यष्टिरक्षकाची भूमिका न देता फलंदाजीतही पाचव्या क्रमांकावर पाठवावे. धोनीऐवजी अन्य युवा खेळाडूकडे यष्टिरक्षण तसेच हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करण्याची सूत्रे सोपवावी, असेही प्रसाद यांनी सुचवले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चातुर्मास ः उत्सव विशेष

अंजली आमोणकर चातुर्मासात सर्वच गोष्टी आपापसावर अवलंबून असल्याने यापायी नकळत देशाची आर्थिक स्थिती सुधारते. असा हा मनस्वास्थ्य देणारा,...

पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीचा लेखाजोखा

अरविंद व्यं. गोखले(ज्येष्ठ संपादक) ज्येष्ठ पत्रकार श्री. वामन सुभा प्रभू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन हिमाचल प्रदेशचे...

आणखी एक बँक बुडाली

दिवसागणिक बुडीत खात्यात चाललेल्या मडगाव अर्बन सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्दबातल करून रिझर्व्ह बँकेने नुकताच निर्णायक दणका दिला. पुढच्याच वर्षी ही बँक...

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

ALSO IN THIS SECTION

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

कोळसा प्रश्‍नावरून गदारोळ

>> विधानसभेचे कामकाज दीड तास तहकूब गोव्याला मिळालेल्या कोळशाच्या पट्ट्यासंबंधी विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर न देता तो प्रश्‍न...

कोरोनाने २ मृत्यू, १५२ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४३२२ स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात १५२ चाचण्या...

विद्याधीशतीर्थ स्वामींचे पीठारोहण भक्तिभावाने

५४० वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४वे स्वामी महाराज म्हणून श्र्‌रीमद् विद्याधीश श्र्‌रीपाद वडेरतीर्थ स्वामी महाराजांनी काल शुक्रवारी...