25 C
Panjim
Monday, August 2, 2021

धोनीच्या नेतृत्व शैलीत झाले आमूलाग्र बदल

 

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपल्या प्रारंभीच्या नेतृत्वकाळात (२००७) गोलंदाजांवर नियंत्रित ठेवणे आवडायचे. पण, २०१३ सालापर्यंत त्याने आपल्या शैलीत बदल करून गोलंदाजांवर विश्‍वास ठेवायला सुरुवात केली. त्याचे नेतृत्व परिपक्व बनले, असे भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज इरफान पठाण याने काल रविवारी सांगितले. स्टार स्पोर्टस्‌च्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात धोनीच्या नेतृत्वशैलीत झालेल्या बदलाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना तो बोलत होता.
३५ वर्षीय पठाण हा धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ सालचा टी-ट्वेंटी विश्‍वचषक जिंकलेल्या तसेच २०१३ साली चॅम्पियन्स करंडक जिंकलेल्या संघाचा अविभाज्य घटक होता.

‘तुम्हाला प्रथमच संघाचे नेतृत्व सोपवले जाते त्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असता, असे पठाण पुढे म्हणाला. संघ बैठकीच्या वेळेत मात्र कधीच बदल झाला नाही. केवळ २००७ साली तो पाच मिनिटांत म्हणणे मांडायचा व २०१३ सालीसुद्धा ही परंपरा सुरूच होती, असे या वर्षीच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या पठाणने सांगितले. धोनीच्या २००७ सालातील नेतृत्वाबद्दल सविस्तर बोलताना पठाण म्हणाला की, २००७ साली धोनी गोलंदाजाला समजवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी उत्साहाच्या भरात यष्टिरक्षकाच्या जागेवरून धावत गोलंदाजापाशी यायचा. अनुभवावरून त्याने खूप बदल केले. धोनी महत्त्वाच्या क्षणी मध्यमगती गोलंदाजांना अधिक प्राधान्य द्यायचा. पण काळानुरुप त्याने संथगती, फिरकी गोलंदाजांना विश्‍वास देत त्यांना प्रतिस्पर्धी संघ ऐन भरात असताना त्यांच्याकडे चेंडू सोपवण्याचे सत्र आरंभल्याचे पठाण शेवटी म्हणाला.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी-ट्वेंटी विश्‍वचषक, २०१० व २०१६ सालचा आशिया चषक, २०११ सालचा वनडे विश्‍वचषक व २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी अशा महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. पण, २०१९ साली विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर धोनीने बीसीसीआयला आपली अनुपलब्धता कळवली होती.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चातुर्मास ः उत्सव विशेष

अंजली आमोणकर चातुर्मासात सर्वच गोष्टी आपापसावर अवलंबून असल्याने यापायी नकळत देशाची आर्थिक स्थिती सुधारते. असा हा मनस्वास्थ्य देणारा,...

पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीचा लेखाजोखा

अरविंद व्यं. गोखले(ज्येष्ठ संपादक) ज्येष्ठ पत्रकार श्री. वामन सुभा प्रभू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन हिमाचल प्रदेशचे...

आणखी एक बँक बुडाली

दिवसागणिक बुडीत खात्यात चाललेल्या मडगाव अर्बन सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्दबातल करून रिझर्व्ह बँकेने नुकताच निर्णायक दणका दिला. पुढच्याच वर्षी ही बँक...

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

ALSO IN THIS SECTION

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

कोळसा प्रश्‍नावरून गदारोळ

>> विधानसभेचे कामकाज दीड तास तहकूब गोव्याला मिळालेल्या कोळशाच्या पट्ट्यासंबंधी विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर न देता तो प्रश्‍न...

कोरोनाने २ मृत्यू, १५२ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४३२२ स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात १५२ चाचण्या...

विद्याधीशतीर्थ स्वामींचे पीठारोहण भक्तिभावाने

५४० वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४वे स्वामी महाराज म्हणून श्र्‌रीमद् विद्याधीश श्र्‌रीपाद वडेरतीर्थ स्वामी महाराजांनी काल शुक्रवारी...