
हिरो आय् लीग
माजी विजेता धेंपो स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा या स्थानिक प्रतिस्पर्ध्यांमधील महत्त्वपूर्ण हीरो आय लीग सामना आज येथील नेहरू स्टेडियमवर (फातोर्डा) सायंकाळी ५.३० वा. होईल.
धेंपो स्पोर्ट्ंस क्लबने परराज्यातील पहिल्या दोन सामन्यात बंगळुरू एफसी (बंगळूर) आणि भारत एफसी (पुणे) संघांना गोलशून्य रोखले होते तर स्पोर्टिंग क्लबने आपल्या स्वगृहीच्या पहिल्या सामन्यात ईस्ट बंगालला १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते.नुकत्याच झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेंतील याच मैदानावर झालेल्या मुकाबल्यात धेंपोने स्पोर्टिंग क्लबवर ४-१ असा सफाइर्ंदार विजय मिळविला होता तर गोवा प्रोफेशनल लीगमधील उभयतातील लढत १-१ अशी गोलबरोबरीत सुटली होती.
गेल्या परराज्यातील दोन सामन्यातील प्रभावी कामगिरीनंतर स्वगृहीच्या पहिल्या सामन्यात आपला संघ विजयी लय साधील असा आत्मविश्वास धेंपोचे प्रशिक्षक अर्थुर पापास यांनी प्रगटविला.दोन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुध्दच्या पहिल्या दोन सामन्यातील संघाच्या कामगिरीवर आपण संतुष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
केवळ ७२ तासांच्या अंतरात आपल्या संााला सामने खेळावे लागत असल्याचे सांगून वेळापत्रक रचनेबाबत पापास यांनी असमाधान प्रगटविले. दुखापतीमुळे ३ ते ४ प्रमुख खेळाडू अनुपलब्ध आहेत पण येत्या काही आठवड्यात संपूर्ण संघ उपलब्ध होईल अशी आशाही पापास यांनी प्रगटविली.
धेंपो स्पोटर्ं्स क्लबतर्फे आपल्या पदार्पणावर आपण संतुष्ट असून शेष मोसमात नव्या संघसाथीं समवेत उत्तम लय साधण्यास आपण उत्सुक असल्याचे धेंपोंचा नवा खेळाडू कार्लोस हेर्नांडेझने सांगितले. भारत एफसीविरुध्दच्या सामन्यात कॉस्टारिकन हेर्नांडेझ मधल्याफळीत खेळला होता.
बलाढ्य ईस्ट बंगालाला पहिल्या सामन्यात रोखल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला असून या दसर्या सामन्यातही उत्तम कामगिरीची अपेक्षा असल्याचे स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षक मॅथ्यू कॉस्टा म्हणाले.
आमचा संघ युवा दमाचा असून आम्ही उत्तम सराव केलेला असून या महत्वपूर्ण लढतीसाठी सज्ज आहेत, असे स्पोर्टिंगचा कर्णधार अँथनी वॉल्फ म्हणाला.
स्पोर्टिंगचा जायबंदी स्ट्रायकर व्हिक्टोरिनो फर्नांडिस मात्र या सामन्यात खेळू शकणार नाही.
