‘धेंपो’ला लेदरबॉल क्रिकेटचे विजेेतेपद

0
113

धेंपो क्रिकेट क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबचा ४ गड्यांनी पराभव करत अखिल भारतीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेेचे विजेतेपद पटकावले. सांगे क्रिकेटर्सने सांगे क्रिकेट मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम फलंदाजी करताना साळगावकरने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या. त्यांच्या सौरभ दुबे याने केवळ ३० चेंडूंत ६२ धावांची झंझावाती खेळी केली. प्रत्युत्तरादाखल धेंपोने ४ गडी व ३ चेंडू राखून विजय साकार केला.
विजेत्या धेंपो क्लबने १ लाख रुपये व करंडकाची कमाई केली तर उपविजेत्यांना ५० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. सांगेचे नगराध्यक्ष रुमाल्डो फर्नांडिस यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी क्विरोझ क्रुझ, अभिजित देसाई, सिद्धेश भिसे, आशिष करमळकर व पंढरीनाथ कर्पे उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक ः साळगावकर सीसी २० षटकांत ७ बाद १९० (सौरभ दुबे ६२, राहुल मेहता ४०, रौनक शर्मा २४, समद फल्लाह ३३-३, आशुतोष उपाध्याय ४५-२, सनी पटेल २७-१) पराभूत वि. धेंपो सीसी १९.३ षटकांत ६ बाद १९१ (ध्रुमिल मटकर ४८, एकनाथ केरकर ३५, जय बिस्ता २९, आदित्य धुमाल २४-२, जावेद खान ४२-२), वैयक्तिक बक्षिसे ः सामनावीर ः ध्रुमिल मटकर, स्पर्धावीर ः जय बिस्ता, सर्वोत्तम फलंदाज ः स्वप्नील साळवी, सर्वोत्तम गोलंदाज ः सनी पटेल.