
स्थानिक प्रतिस्पर्धी स्पोर्टिंग क्लब दी गोवावर ३-० असा एकतर्फी विजय मिळवित धेंपो स्पोटर्ंस क्लबने हीरो आय् लीग फुटबॉल स्पर्धेच्या तिसर्या फेरीतील पूर्ण तीन गूण प्राप्त केले.
येथील नेहरू स्टेडियमवर (फातोर्डा) झालेल्या या सामन्यात विजेता धेंपो स्पोर्टस क्लब मध्यंतराला १-० असा आघाडीवर होता. लेनी रॉड्रिक्स (२८वे मिनिट), ऑल्विन जॉर्ज (५०वे मिनिट) आणि फ्रान्सिस फर्नांडिस (९०+ मिनिट) यांनी विजेत्यांतर्ंफे गोल नोंदले.
या विजयासह धेंपोने तीन सामन्यातून पाच गूण जमविले तर स्पोर्टिंग क्लब दोन समान्याअखेर एका गूणावर राहिला.धेंपो स्पोटर्ंस क्लबचे प्रशिक्षक अर्थुर पापास यांनी संघात दोन बदल करताना आल्विन जॉर्ज आणि क्लिफर्ड मिरांडा यांना मंदार राव देसाई आणि होलिचरण नार्झरी यांच्या जागी खेळविले. स्पोर्टिंगचे प्रशिक्षक मॅथ्यू डिकॉस्टा यांनीही दोन बदल करताना प्रतेश शिरोडकर आणि सुमीत पासी यांना डॉन बॉस्को फर्नांडिस आणि जोसेफ परेरा यांच्या जागी उतरविले.
उभय संघानी प्रारंभापासून आक्रमक पवित्रा अवलंबिला होता. तथापि, फेडरेशन कप स्पर्धेंत स्पोर्टिंगवर ४-१ असा विजय मिळविलेल्या धेंपो क्लबचे सामन्यावर बव्हंशी वर्चस्व होते. पाचव्याच मिनिटाला धेंपोचा पीटर कावार्ंल्यो जखमी झाल्याने जरमनप्रीत सिंगला त्याच्या जागी उतरविण्यात आले.
२०व्या मिनिटाला स्पोर्टिंगने पहिली चढाई केली. प्रतेश शिरोडकरने अँथनी वॉल्फला गोलतोंडावर सुरेख पास दिला पण धेंपोचा बचावपटू कॅलम ऍग्नसने त्याचा फटका परतविला.
पाच मिनिटात धेंपोने प्रतिहल्ला केला, पण लेनी रॉड्रिक्सच्या पासनंतर क्लिफडर्ं मिरांडाने हाणलेला लेफ्टफूटर फटका स्पोर्टिंगचा गोलरक्षक रवी कुमारने थोपविला. २८व्या मिनिटाला मध्यरक्षक लेनी रॉड्रिक्सने धेंपोने आघाडीचा गोल केला. कार्लेस हेर्नांडेझच्या पासनंतर लेनीने प्रतिस्पर्धी बचावपटू रोजन सिंह आणि जोवेल मार्टिन्सला चकवीत आणि तेज राइटफूटर फटका गोलरक्षक रवीकुमारला मुळीच संधी न देता जाळीत फटकावला (१-०).
मध्यंतराच्या ‘स्टॉपेज टाइम’मध्ये क्लिफर्ड मिरांडाविरुध्दच्या ‘फाऊल’ प्रकरणी पंचानी क्लेमेंत जोसेफेला दुसरे यलो कार्ड देत मैदानाबाहेर काढले आणि स्पोर्टिंगला नंतर दहा खेळाडूनिशी खेळावे लागले.
उत्तरार्धात धेंपोने या अनुकूलतेचा पूर्ण लाभ उठविताना पाचव्याच मिनिटाला आघाडीवृध्दीत यश मिळविले. जरमनप्रीत सिंहच्या पासनंतर आल्विन जॉर्जने ‘मार्कर’ रोजन सिंहला चकवित धेंपोचा दुसरा गोल नोंदवला (२-०).
लगेचच धेंपोला आघाडीवृध्दीची आणखी एक संधी मिळाली, पण क्लिफर्ड मिरांडाने फर्नांडिसला चकवित हाणलेला फटका गोलरक्षक रवीकुमारने रोखला. मध्यावधीस आल्विन जॉर्जलाही आपला दुसरा गोल नोंदण्याची संधी होती, पण फ्रान्सिस फर्नांडिसच्या चालीनंतर लेनीने दिलेल्या पासवरील आल्विनचा फटका बाहेर गेला. स्पोर्टिंगनेही थोडाफार प्रतिकार दर्शविण्याचा प्रयत्न केला, पण रॉयस्टनच्या कॉर्नरवरील कालू ओग्बाची हेडर बाहेर गेली. ६६व्या मिनिटाला स्पोर्टिंगचा गोलरक्षक रवी कुमारने फ्रान्सिस फर्नांडिसचा गोलप्रयत्न थोपविला तर हेर्नांडेझच्या पासवर आल्विनने आणखी एक संधी गमावली. ८३व्या मिनिटाला राखीव मंदार राव देसाईचा गोलप्रयत्न बचावपटू रॉयस्टनने थोपविला.
‘इंज्युरी टाइम’मधील चौथ्या मिनिटाला फ्रान्सिस फर्नांडिसने धेंपोचा तिसरा व विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदवला. जरमनप्रीतने गोलतोंडावर दिलेला पास स्पोर्टिंगचा बचावपटू जॉयनरने थोपविला. पण तो तेथेच संधीची वाट पहात असलेल्या फ्रान्सिसला मिळाला आणि त्याने तो अचूक जाळीत फटकावीत धेंपोच्या विजयावर शिक्कामोर्तब (३-०) केले.
धेंपो : लक्ष्मीकांत कट्टीमणी, कॅलम ऍग्नस, देवव्रत रॉय, निर्मल छेत्री, रॉविल्सन रॉड्रिक्स, लेनी रॉड्रिक्स, फ्रान्सिस फर्नांडिस, पीटर कावार्ंल्यो (जी. सिंग), आल्विन जॉर्ज (होलीचरण नार्झरी), कार्लोस हेर्नांडेझ (मंदार देसाई).
स्पोर्टिंग क्लब दी गोवा : रवी कुमार, जोसेफ क्लेमेंत, जे. लॉरेन्स, सिंगम सिंह, जे. मार्टिन, प्रतेश शिरोडकर (फर्नांडिस), कालू ओग्बा, बॉर्जिस, सुमित पासी (डिसौझा), अँथनी वॉल्फ, मॉविन बॉर्जिस (बोयमा कार्पेह).
