क्लेन्सिओ पिंटो आणि फ्रेडसन मार्शल यांनी नोंदलेल्या गोलावर धेंपो स्पोर्टस क्लबने जीएफए तासा गोवा अंडर-२० लीग लढतीत स्पोर्टिंग क्लब दी गोवावर २-० असा सफाईदार विजय प्राप्त केला.
धुळेर मैदानावरील या सामन्यात विजेता धेंपो क्लब मध्यंतराला २-० असा आघाडीवर होता. २७व्या मिनिटाला क्लेन्सिओ पिंटोने आपल्या मार्करला चकवीत धेंपोचा आघाडीचा गोल केला.
तीन मिनिटानंतर क्लेन्सिओला आणखी एक संधी मिळाली पण त्याचा पेनल्टी फटका स्पोर्टिंगचा गोलरक्षक ऍलिसन फर्नांडिसने परतविला आणि रिबाऊंडवरील क्लेन्सिओचा फटका बाहेर गेला.
उत्तरार्धात स्पोर्टिंगने जोरदार प्रतिहल्ले केले आणि योगेंद्र थापाने धेंपोच्या गोलरिंगणावर दडपण आणले पण यश आले नाही. अंतिमक्षणात फ्रेडसन मार्शलने धेंपोचा दुसरा व विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदला.

