धुळेर येथे सुरीहल्ला

0
49

धुळेर म्हापसा येथील पेट्रोल पंपावर काल रात्री ८.४५ वा. सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शैलेश गरड याच्यावर सुरीहल्ला करून त्याला जखमी केले. याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

शैलेश गरड (३०) व अजय शिंदे (२५) हे दोघे कुचेलीहून म्हापसा पोलीसांत काहीतरी तक्रार देण्यासाठी जाताना धुळेर पेट्रोल पंपजवळ तिघांनी त्यांना मोटरसायकल आडवी घालून अडवले व नंतर वार केला.
दरम्यान, पोलिसांनी संशयितांनी वापरलेली सीबीआर व गरड याची डिओ स्कूटर ताब्यात घेतली आहे.