धुळापी – बाणस्तारी महामार्गावर दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
4

राज्यात अपघाती मृत्यूचे सत्र सुरू असून धुळापी – बाणस्तारी येथे राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी आठच्या सुमारास दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एका दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसरा दुचाकीचालक जखमी झाला असून त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
या अपघातात अंकित नाईक (भोम-फोंडा) याचे जागीच निधन झाले असून बुरहानुद्दीन कोटावाला हा जखमी झाला आहे. अंकित नाईक हा भोम येथून दुचाकीने पणजीला येत होता. तर, जखमी बुरहानुद्दीन हा विरुद्ध दिशेने जात होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी जुने गोवा पोलीस तपास करीत आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.