धावत्या लोकलमध्ये महिलेचा खून

0
49
मुंबईत चालत्या लोकलमध्ये सामानाच्या डब्यात महिलेचा खून होण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ही भाजीविक्रेती महिला असून तिचे नाव पंगा अंधेरी (५५) असे असल्याचे कळले आहे. भाजी सोबत घेऊन ती विरार-चर्चेगेट रेल्वेतून पहाटे ४ वा. जात होती.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने वेग पकडल्यानंतर एक व्यक्ती महिला होती तिथे आला व तिष्ण सुर्‍याने तिला भोसकत राहिला. महिलेचा किंचाळण्याचा आवाज ऐकून बाजूच्या डब्यातील गार्ड तेथे पोचला व त्याने विरार स्थानकावर रेल्वे थांबवली. महिलेला इस्पितळात नेताना वाटेत निधन झाले. खून करणारा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस त्याच्या शोधात आहेत.