धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

0
9

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी काल बुधवारी सरन्यायधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १६वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ म्हणजेच सुमारे ७ वर्षांचा होता. त्यांच्या निवृत्तीनंतर ३७ वर्षांनी त्यांचे पुत्र न्यायमूर्ती धनंजय यांची त्याच पदावर नियुक्ती झाली आहे.

नोएडा ट्विन टॉवर्स पाडण्याचा निर्णय
नोएडा येथील सुपरटेकचे दोन्ही टॉवर २८ ऑगस्ट रोजी पाडण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. या बांधकामात नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमांचे उल्लंघन झाले होते.