मडगावच्या नव्या जिल्हाधिकारी इमारत संकुलाचे उद्घाटन उद्या गुरुवार दि. २८ रोजी सायंकाळी ५ वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होत आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दिलेल्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई तसेच नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांची नावे नसल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून हे उद्घाटन निश्चित केले आहे. या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो हे उपस्थित राहणार आहेत.

