द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतिपदाची शपथ

0
14

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू आज सोमवारी २५ जुलै रोजी शपथबद्ध होणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.

द्रौपदी मुर्मू आज दि. २५ रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणार्‍या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाल्यानंतर त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सकाळी ९.२५ वा. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे रवाना होतील. १०.१५ वा. शपथविधी सोहळा झाल्यानंतर १०.२० वा. नवीन राष्ट्रपतींचे भाषण होणार आहे. तर ११ वा. मावळत्या राष्ट्रपतींना निरोप देण्यात येईल.