दोषींना कठोर शिक्षाव्हावी : आरएसएस

0
13

अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपले पहिले निवेदन जारी केले आहे. या घटनेमुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे आरएसएसने म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी हे निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षामुळे आणि लाखो रामभक्तांच्या समर्पण, त्याग व भक्तीमुळे रामजन्मभूमीवर बांधलेले हे भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी आदर, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा केलेल्या निधीची चोरी ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या (आरएसएससह) भावना आणि श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. तपासात दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, असेही आरएसएसने म्हटले आहे.