Home बातम्या दोन राज्य माहिती आयुक्त नेमण्याचा सरकारचा विचार

दोन राज्य माहिती आयुक्त नेमण्याचा सरकारचा विचार

0

सरकार एका राज्य माहिती आयुक्ताऐवजी दोन माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याबाबत विचार करीत असून त्यापैकी एक पद महिला उमेदवाराला तर एक पद पुरूष उमेदवाराला देण्याबाबत विचार चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माहिती हक्क कार्यकर्ते राजन घाटे यांना दिलेल्या आश्‍वासनानुसार येत्या २९ रोजी सरकार राज्य माहिती आयुक्तांचे नाव जाहीर करण्यासंबंधीची तयारी करीत असतानाच मुख्य माहिती आयुक्तांच्या नावाची घोषणा मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. वरील प्रश्‍नावरून उपोषणाला बसलेले माहिती हक्क कार्यकर्ते राजन घाटे यांनी मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त या दोन्ही पदांसंबंधीचा निर्णय २९ रोजी झाला नाही तर पुन्हा उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.