दोन बसची समोरासमोर धडक, 11 जणांचा मृत्यू

0
15

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूरजवळ रविवारी दुपारी दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 महिला, 2 मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात 20 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. या धडकेमुळे बसचा ढिगारा रस्त्यावर पसरला. लोकांचे मृतदेह सीटमध्ये अडकले होते. लोकांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर, स्थानिक लोकांनी बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढले.