Home बातम्या दोन नायजेरियन कार चोरांना अटक

दोन नायजेरियन कार चोरांना अटक

0

पर्वरीतून पळविलेल्या कारसह दोन नायजेरियन नागरिकांना कळंगुट येथे पकडण्यात पोलिसांना यश आले.

दि. १६ रोजी येथील गौरी पेट्रोल पंपानजीक देवानंद शिरोडकर यांनी पार्क करून ठेवलेली जी ए ५, बी-११२१ ही आयकॉन हुंदाय कार जेम्स पिटर आणि एडवीन चँकू यांनी दुपारी १२.४५च्या दरम्यान पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती.

त्यानंतर पर्वरी व कळंगुट पोलिसांनी संयुक्तपणे कामगिरी करीत वरील दोघांना ताब्यात घेतले. काल त्यांना कोर्टात उभे केले असता दोन दिवसांचा रिमांड देण्यात आला.