दोन अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश जारी

0
13

केंद्रीय मंत्रालयाने राज्यातील दोन आयएएस अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला असून, राज्यात नवीन तीन आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. गोव्यातील आयएएस अधिकारी रवी धवन आणि आयएएस अधिकारी रुचिका कटियाल यांची बदल करण्यात आली आहे, तर आयएएस अधिकारी श्रीकांत टी., सरप्रीत सिंग गील आणि पोलुमाटीया पी. अभिषेक यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली आहे.