दोन अतिरेक्यांचा खात्मा; तीन जवानांना वीरमरण

0
15

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या एका तळावर घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन अतिरेक्यांचा काल खात्मा करण्यात आला. या मोहिमेत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले.

लष्कराच्या एका तळावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतिरेक्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली. राजौरीपासून २५ किलोमीटर दूर दरहाल भागातील परहालमध्ये लष्कराची ही छावणी आहे. या छावणीच्या कुंपणांमधून घुसण्याचा दोन अतिरेकी प्रयत्न करत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. यावेळी चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करून लष्कराने आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला. या मोहिमेत तीन जवान शहीद झाले, तर पाच जवान जखमी झाले.