दोन्ही जागा काँग्रेस पक्षच जिंकणार : पाटकर

0
5

राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा यावेळी काँग्रेस पक्षच जिंकणार असल्याचे काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.
भाजपने मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही पाटकर यांनी केला. आचारसंहिता भंगाच्या कित्येक लेखी तक्रारी आम्ही आयोगाकडे दाखल केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

त्याशिवाय आणखी एक गंभीर बाब म्हणजे कित्येक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडली होती. काही ठिकाणी यंत्रे व्यवस्थितपणे चालत नव्हती. काही व्हीव्हीपॅट यंत्रातून स्लिप खाली पडत नव्हत्या, तर काही यंत्रांतील लाईट बंद पडत होती, अशा कित्येक तक्रारी मतदारांनी केल्या असल्याचे पाटकर म्हणाले.