दोनापावला येथे एका घरावर पडलेल्या दरोड्या प्रकरणी 400 पानी आरोपपत्र गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात पाच आरोपींची नावे असून, 30 साक्षीदारांचीही जबानी या आरोपपत्रात नोंदवली आहे.
एप्रिल 2025 मध्ये दोनापावला येथील एका बंगल्यावर हा दरोडा पडला होता. यावेळी दरोडेखोरानी या बंगल्यातील ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला दोरखंडानी बांधून घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व अन्य माल लंपास केला होता. या दरोड्याप्रकरणी गोवा पालिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीत पाच बांगलादेशी नागरिकांना व उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाला अटक केली होती.
या दरोड्यातील सर्व आरोपी हे कोलवाळ तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात उभे करण्यात आले.

