देश सैनिकांच्या पाठीशी असल्याचा संदेश द्या ः मोदी

0
109

संपूर्ण देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा आहे हा संदेश सर्व संसद सदस्य देतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसद अधिवेशनाच्या प्रारंभी बोलताना व्यक्त केला.

आपले सैनिक धैर्याने सीमांवर उभे आहेत. आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ कटिबद्ध आहेत. त्याच प्रकारे आपली संसदही एकमुखाने या सैनिकांच्या पाठीशी देश उभा असल्याचा संदेश देईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.