देशात नव्या 564 कोरोनाबाधितांची नोंद

0
4

5 महिन्यांच्या बालकासह व्याधीग्रस्त 7 जण दगावले

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही भागांमध्ये सहव्याधींनी ग्रस्त असणाऱ्या कोविडबाधितांचा मृत्यू झाल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. केंद्र सरकारने काल दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत नवे 564 कोरोनाबाधित सापडले असून, एकूण आकडा 4866 वर पोहोचला आहे. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका 5 महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे.

कोविड काळाप्रमाणेच आताही दररोजची कोविडबाधितांची व मृतांची आकडेवारी केंद्र सरकारकडून जाहीर केली जात आहे. यासंदर्भात गुरुवारच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने कोणत्या राज्यात किती कोविडबाधित व मृतांची संख्या आहे, याची सविस्तर यादी संकेतस्थळावर दिली आहे. त्यानुसार आंध्र प्रदेश 50, आसाम 8, बिहार 31, छत्तीसगड 19, गोवा 8, गुजरात 508, हरियाणा 63, हिमाचल प्रदेश 1, झारखंड 8, कर्नाटक 436, केरळ 1487, मध्य प्रदेश 30, महाराष्ट्र 526, मिझोराम 1, ओडिशा 18, पंजाब 16, राजस्थान 103, सिक्कीम 9, तामिळनाडू 213, तेलंगणा 3, उत्तर प्रदेश 198, उत्तराखंड 6, पश्चिम बंगाल 538 अशी रुग्णसंख्या आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांत सध्याच्या घडीला एकही कोरोना रुग्ण नाही.

7 जणांच्या मृत्यूची नोंद
महाराष्ट्रात सहव्याधीग्रस्त तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यात 76 वर्षांच्या दोन तर 79 वर्षांच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. दिल्लीत मृतांचा आकडा 2 असून, त्यात 87 वर्षीय व्यक्तीसोबत एका 5 वर्षाच्या लहान मुलाचाही समावेश आहे. कर्नाटकमध्ये देखील अनुक्रमे 65 व 42 वर्षीय कोरोनाबाधितांचा
मृ्‌‍त्यू झाला आहे.