देशात कोरोनामुळे अडीच हजारांचा मृत्यू

0
153

भारतात कोरोनामुळे मरण पावणार्‍यांची संख्या काल २५४९ वर गेली. तर गेल्या २४ तासात नवीन ३७२२ कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ७८ हजार झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
एकूण ७८ हजार कोरोना बाधितांपैकी २६,२३५ जण बरे झाले असून ४९,२१९ जणांवर उपचार चालू आहेत. महाराष्ट्रातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या २५ हजारवर गेली असून त्यापैकी ५५४७ जण बरे झाले आहेत. तर तेथे कोरोनामुळे ९७५ जण मरण पावले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ कोरोनाचा सर्वाधिक फटका गुजरात व तामिळनाडू या राज्यांना बसला आहे.