देशात कोरोनाबाधित बळी १००० च्यावर

0
120

 

लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्याप कोरोनावर नियंत्रण प्राप्त झालेले नाही. भारतात गेल्या २४ तासांत ७३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली असून मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाची नवी लक्षणे जाहीर

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या लक्षणात सहा नवीन घटकांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे त्यांचाही विचार निदान करताना करणे गरजेचे आहे. अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने या लक्षणांचा समावेश केला आहे. नवीन लक्षणांमध्ये थंडी वाजून येणे, थंडी वाजून अंग शहारणे, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा धरणे, चव किंवा वास संवेदना जाणे यांचा समावेश आहे. या आधी सीडीसीने जी लक्षणे जाहीर केली होती त्यात ताप, कफ, श्वास घेण्यात अडचण या लक्षणांचा समावेश करण्यात आला होता. विषाणूशी संपर्क आल्यापासून २ ते १४ दिवसांत ही लक्षणे दिसू शकतात.