देशभरात चोवीस तासांत २ लाखांवर बाधित

0
135

देशात काल दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख ७३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सलग दुसर्‍या दिवशी एक हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.