गेल्या २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ४७ हजार ४१७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, ३८० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत देशभरात ४,८५,०३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. तसेच ८४ हजार ८२५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ११,१७,५३१ वर पोहोचली आहे.