देणगी चोरी प्रकरणीएसआयटी चौकशी सुरू

0
6

अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये (दान) मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापले आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांनंतर आता विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, एसआयटी पथकाने आतापर्यंत 42 संशयित कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांच्या चोरीबाबत मंगळवारी पोलिसांकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या. पहिली तक्रार ‘धर्मसेना’चे संस्थापक संतोष दुबे यांनी, दुसरी उत्तर प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद शुक्ला यांनी आणि तिसरी करणी सेनेने दाखल केली. मात्र, पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही.