‘दृश्यम’ चे दिग्दर्शक निशिकांत कामत निवर्तले

0
156

‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यासारख्या अनेक बॉलिवूडपटांचे आणि ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे काल वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. हैदराबादेतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. निशिकांत यांना यकृताचा आजार होता.

निशिकांत यांच्या ‘दृश्यम’ या गोव्यात चित्रीत झालेल्या रहस्यपटाने रसिकांची मने जिंकली होती. त्यांचा ‘डोंबिवली फास्ट’ हा मराठी चित्रपटही गाजला होता व त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. जॉन अब्राहमच्या ‘रॉकी हँडसम’ चित्रपटात निशिकांत यांनी खलनायकही साकारला होता.