Home बातम्या दूरचित्रवाणी कार्यक्रम देखरेखीसाठी समिती

दूरचित्रवाणी कार्यक्रम देखरेखीसाठी समिती

0

दक्षिण जिल्हा पातळीवर केबल टी. व्ही. चॅनल्सचे कार्यक्रम व जाहिराती यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.

चॅनल्सबाबत काही तक्रारी, गार्‍हाणी असल्यास किंवा आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास ही समिती निर्णय घेणार आहे. तक्रारी गार्‍हाणी असल्यास जिल्हाधिकार्‍यांकडे सादर कराव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.