दूधसागर धबधब्यावर पाणी भरलेले असून पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी जातात. पण तेथे कोणतीच दुर्घटना घडू नये म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटक, ट्रॅकर्ससह इतरांना पूर्णत: बंदी घातल्याचा आदेश जारी केला आहे. तिकिट काढून पायथ्याशी धबधबा पाहण्यास परवानगी दिली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दूधसागर रेल्वेस्टेशन ते रेल्वे पुलापर्यंत जाण्यास परवानगी दिली आहे. फक्त पोलीस, रेल्वे अधिकारी, वन खात्याचे अधिकारी व परवाना असलेल्यांना तसेच त्या भागात अधिकृतपणे काम करणारे सरकारी अधिकारी तेवढे जावू शकतील. कुळे, केसरलॉक, सोनावली व करंजाळे स्टेशनवर पोलीस तैनात करण्याचे आदेश दिले आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाला तैनात करण्यात आले आहे.