मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर त्यांचा पुन्हा एकदा पराभव होईल, असा दावा जलस्रोतमंत्री आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातील निवडणूक लढविण्याबाबत सुतोवाच केले आहे. त्या विषयावरील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सुभाष शिरोडकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपण दीपक ढवळीकर यांचा पराभव केला होता. दीपक ढवळीकर यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

