ज्या कुटुंबाचे दोन सदस्य असतील, त्याला वर्षाला अडीच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. तीन सदस्य असलेल्या कुटुंबाला तीन लाख रूपयांचे, चार सदस्यीय कुटुंबाला साडे तीन लाख रुपयांचे, पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला चार लाख रुपयांचे व सहा सदस्यीय कुटुंबाला साडे चार लाख रुपयांचे विमासंरक्षण या नव्या योजनेद्वारे मिळणार आहे. कुटुंबात सहापेक्षा अधिक सदस्य असतील तर त्यांना एकापेक्षा अधिक कार्डे करावी लागतील असे पार्सेकर यांनी सांगितले.
गोवा वैद्यकीय इस्पितळात पाच कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी ह्रदयरोग इस्पितळ उभारण्यात येणार असल्याची माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली. या इस्पितळाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली असून गेल्या ऑक्टोबरपर्यंत इस्पितळ उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या इस्पितळासंदर्भात शिरीष बोरकर, मंजुनाथ देसाई व सुनील चंद्रा या तीन ह्रदयरोग तज्ज्ञांची यापूर्वीच भरती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुप्रसाद नाईक, विकास साबू व गौरी पांचे हे डॉक्टर लवकरच या इस्पितळाच्या सेवेत रुजू होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.