दीड कोटींचे ड्रग्स हरमल येथे जप्त

0
7

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने हरमल येथे काल छापा घालून एका रशियन नागरिकाला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे 1.69 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत केले. या प्रकरणी एवजिनी मोर्कोविन या रशियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अमलीपदार्थविरोधी पथकाने मधलावाडा हरमल येथील एका भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या मॅजिक मशरूम प्लान्टेशनचा पर्दाफाश केला. रशियन नागरिकाकडून 218 ग्रॅम सायलोसायबीन मशरूम, 7.9 किलोग्रॅम मशरूम कळ्या, 2 किलो गांजा व इतर प्रकारचा अमलीपदार्थ हस्तगत केला आहे.