दीडशेहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

0
1

६ रुग्ण इस्पितळात दाखल
सक्रिय रुग्णसंख्या ८६६ वर

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन १५६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागले आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ८६६ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२.७६ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत नवीन १२२२ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यात १५६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३३ एवढी आहे. चोवीस तासांत नवीन ६ रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागले आहे. याच महिन्यात यापूर्वी एकाच दिवशी सात जणांना इस्पितळात दाखल करावे लागले होते. मागील चोवीस तासांत आणखी ८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.