ट्राईने जारी केलेल्या प्रतिदिनी २०० एसएमएस मर्यादेच्या अधिसूचनेला रद्द करण्याच्या दूरसंचार लवादाच्या निर्णयास काल सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
आदित्य यांच्या याचिकेस अनुसरून लवादाने निर्णय घेतला होता. या निर्णयास दूरसंचार नियमन अधिकारिणी (टाई)ने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे ट्राई पुन्हा २०० एसएमएसचा निर्णय अंमलात आणू शकेल.

