दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज : हर्ष वर्धन

0
54

कॉंग्रेसचीही नव्याने निवडणुकीसाठी पसंती

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपण कोणत्याही क्षणी सज्ज असल्याचा दावा दिल्ली भाजप प्रमुख हर्ष वर्धन यांनी काल येथे केला. या निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमत मिळवील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही अन्य मार्गाचा अवलंब करणार नसल्याचे स्पष्ट करून त्यासाठी आपण नव्याने विधानसभा निवडणुकीची वाट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेसाठी शक्यतो लवकर निवडणुका व्हायला हव्यात असे ते म्हणाले. दिल्लीची जनता यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. स्वतः वर्धन प्रतिष्ठेच्या चांदनी चौक मतदारसंघातून १.३५ लाख मतांनी विजयी झाले. सध्या दिल्लीत राष्ट्रपती राजवट असून ती एका वर्षापेक्षा अधिक काळ ठेवता येणार नसल्याने येत्या आठ महिन्यात ही निवडणूक घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावयाचा आहे. एका आठवड्याने निवडणुका घेण्यात येत असतील तरीही भाजप त्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसलाही निवडणुका हव्यात
दरम्यान, दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची शक्यता कॉंग्रेसने फेटाळली असून, त्याऐवजी नव्याने विधानसभेसाठी निवडणुका घेण्यास पसंती असल्याचे दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते मुकेश शर्मा यांनी सांगितले. दिल्लीत सरकार स्थापन करण्याबाबत बोलण्याचा आम आदमी पक्षाला नैतिक अधिकार नाही असेही शर्मा म्हणाले. दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी ङ्गआपफने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेसाठी ङ्गआपफला पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच नसल्याचे ते म्हणाले.