दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपपत्रात सिसोदियांचे नाव नाही

0
25

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. एकूण ७ जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने हे आरोपपत्र दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केले आहे. या न्यायालयात मद्य धोरण घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे सीबीआयने ज्या मनीष सिसोदियांविरुद्ध चौकशीचे रान उठवले होते, त्यांचे नावच या आरोपपत्रात नाही.

सीबीआयने ज्या ७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, त्यापैकी ३ सार्वजनिक सेवेत आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधातही या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचेही सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे; मात्र आता दाखल केलेल्या आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव नाही. आता या आरोपपत्रावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.