राजू चौधरी पत्नी व मुलांसमवेत दिल्लीहून आठ दिवसांपूर्वी गोव्यात आला होता. पत्नी व मुलीला मडगाव येथे ठेवून तो पाच दिवसांमागे हुबळीला जाऊन येतो असे सांगून गेला हेता. तो परत न आल्याची तक्रार त्याची पत्नी सारिका हिने मडगाव पोलिस स्टेशनवर नोंदविली आहे.
सारिका ही कोलकत्ता येथील असून ती दिल्लीला राहत असून पोलिसानी तक्रार नोंदवून घेऊन तपास चालू केला आहे.